छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नोत्तरे (PDF सहित) – स्पर्धा परीक्षा, MPSC आणि शालेय अभ्यासासाठी उपयुक्त मराठी सामान्य ज्ञान माहिती.
छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नोत्तरे भाग 3 (PDF सहित)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ही ३० महत्त्वाची प्रश्नोत्तरे MPSC, स्पर्धा परीक्षा, शालेय अभ्यास आणि सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही संपूर्ण PDF देखील डाउनलोड करू शकता.
📄 PDF डाउनलोड करामहत्त्वाचे प्रश्न आणि स्वतंत्र उत्तरे
१) छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती?
उत्तर: एकूण ८ मुले (२ पुत्र आणि ६ कन्या).
२) राजमाता जिजाऊ कोणत्या घराण्यातील होत्या?
उत्तर: जाधव घराणे, सिंदखेडराजा.
३) मासाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर: म्हाळसबाई जाधव.
४) छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर: छत्रपती शाहू महाराज.
५) शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले?
उत्तर: प्रचंडगड.
६) रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते?
उत्तर: रायरी.
७) शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला?
उत्तर: प्रतापगड.
८) शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली?
उत्तर: दादाजी कोंडदेव.
९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते?
उत्तर: मालोजीराजे भोसले.
१०) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला?
उत्तर: १९ फेब्रुवारी १६३०.
अधिक वाचा ➤ छत्रपती शिवाजी महाराज – GK प्रश्नोत्तरे व उत्तरे (मराठी)११) “गड आला पण सिंह गेला” यात सिंह कोणाला म्हणतात?
उत्तर: तानाजी मालुसरे.
१२) शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला?
उत्तर: तोरणा किल्ला (१६४६).
१३) शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?
उत्तर: ८ पत्नी.
१४) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर: शिवनेरी किल्ला.
१५) शहाजीराजे भोसले हे कोण होते?
उत्तर: शिवाजी महाराजांचे वडील.
१६) शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर: सकवारबाई.
१७) स्वराज्यात एकूण किती किल्ले होते?
उत्तर: सुमारे ३५० किल्ले.
१८) शिवाजी महाराजांनी छत्रपती पदवी केव्हा स्वीकारली?
उत्तर: ६ जून १६७४.
१९) कोंढाणा किल्ल्याला कोणते नाव दिले?
उत्तर: सिंहगड.
२०) प्रमुख गुप्तहेर कोण होते?
उत्तर: बहिर्जी नाईक.
अधिक वाचा ➤ 19 फेब्रुवारी — छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण (मराठी)२१) संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ?
उत्तर: बुधभूषणम्.
२२) सुवर्ण सिंहासनाचे वजन किती होते?
उत्तर: सुमारे ३२ मण.
२३) शिवाजी महाराज जे टोप घालायचे त्याला काय म्हणतात?
उत्तर: जिरेटोप.
२४) धाकट्या पुत्राचे नाव?
उत्तर: राजाराम महाराज.
२५) जन्म कोणत्या तालुक्यात झाला?
उत्तर: जुन्नर तालुका, पुणे जिल्हा.
२६) संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव?
उत्तर: येसूबाई.
२७) शिवाजी महाराजांना किती भाऊ होते?
उत्तर: एक सावत्र भाऊ – व्यंकोजी राजे भोसले.
२८) महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला?
उत्तर: माल्हारगड.
२९) संभाजी महाराजांसोबत कोणाला कैद केले?
उत्तर: कवी कलश.
३०) शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते?
उत्तर: कान्होजी आंग्रे.
अधिक वाचा ➤ छत्रपती शिवाजी महाराज — शाहिस्तेखानचा हल्ला व लाल महाल इतिहास (मराठी)निष्कर्ष
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा, शौर्य आणि स्वराज्याच्या अभिमानाची गाथा आहे. ही प्रश्नोत्तरे तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि ब्लॉग फॉलो करा.
धन्यवाद 🙏
अधिक वाचा ➤ प्रतापगडची लढाई — अफझलखान वध आणि मराठी इतिहास