🚀 आजची खास पोस्ट चुकवू नका — खाली स्क्रोल करा ⬇️

60 क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्न – तुमचा स्कोअर 50+ येतोय का? | 60 Sports GK Questions – Challenge Yourself Now!

60 महत्त्वाचे क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे मराठीत. IPL, ऑलिम्पिक, क्रिकेट, पुरस्कार व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Sports GK संग्रह.
क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे | 60 महत्त्वाचे Sports GK प्रश्न व उत्तरे मराठी
58 क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे – IPL, ऑलिम्पिक, क्रिकेट, फुटबॉल Sports GK Marathi

60 महत्त्वाचे क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्न व उत्तरे – स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Sports GK संग्रह

क्रीडा सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे | 60 महत्त्वाचे Sports GK प्रश्न व उत्तरे

आजच्या स्पर्धात्मक युगात क्रीडा सामान्य ज्ञान (Sports GK) हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. MPSC, पोलीस भरती, तलाठी, रेल्वे, बँकिंग तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये क्रीडाविषयक प्रश्न हमखास विचारले जातात. क्रिकेट, ऑलिम्पिक, फुटबॉल, बुद्धिबळ, कबड्डी यांसारख्या खेळांबद्दल मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.

या लेखात आपण 60 निवडक व महत्त्वाचे क्रीडा प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे पाहणार आहोत. सर्व प्रश्न परीक्षाभिमुख असून विद्यार्थ्यांसाठी तसेच क्रीडा प्रेमींसाठी उपयुक्त आहेत.

भाग १ : क्रीडा सामान्य ज्ञान – प्रश्न व उत्तरे

१. आयपीएल ट्वेन्टी-ट्वेन्टी पहिली स्पर्धा (२००८) विजेता संघ कोणता?
उत्तर – राजस्थान रॉयल्स

२. बुद्धिबळाची सुरुवात कोणत्या देशात झाली?
उत्तर – भारत

३. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

४. सिडनी (२०००) ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण?
उत्तर – कर्णम मल्लेश्वरी

५. कसोटी सामन्यात एका डावात १० बळी घेणारा पहिला भारतीय कोण?
उत्तर – अनिल कुंबळे

६. ‘फुटबॉल सम्राट’ म्हणून कोण ओळखले जातात?
उत्तर – पेले

७. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – अभिनव बिंद्रा

८. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा खेळाडू कोण?
उत्तर – रोहित शर्मा

९. क्रीडा प्रशिक्षकांना केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार कोणता?
उत्तर – द्रोणाचार्य पुरस्कार

१०. हॉकीचा जादूगर म्हणून कोण ओळखले जातात?
उत्तर – मेजर ध्यानचंद

अधिक वाचा ➤ भारताचे राज्ये, राजधानी व क्षेत्रफळ – मराठी माहिती

११. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १०,००० धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

१२. व्हॉलीबॉलची सुरुवात कोणत्या देशात झाली?
उत्तर – अमेरिका

१३. जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण?
उत्तर – पी. व्ही. सिंधू

१४. आयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी पहिला विश्वचषक (२००७) विजेता संघ कोणता?
उत्तर – भारत

१५. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू कोण?
उत्तर – मुथय्या मुरलीधरन

१६. ‘भारताची सुवर्णकन्या’ म्हणून कोण ओळखली जाते?
उत्तर – पी. टी. उषा

१७. अथेन्स (२००४) ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – राज्यवर्धनसिंह राठोड

१८. एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – चेतन शर्मा

१९. आशियायी खेळाला ‘आशियाड’ हे नाव सुचविणारे भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर – जवाहरलाल नेहरू

२०. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान कोणते?
उत्तर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड

अधिक वाचा ➤ छत्रपती शिवाजी महाराज – GK प्रश्नोत्तरे व उत्तरे (मराठी)

२१. एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

२२. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा खेळाडू कोण?
उत्तर – ब्रायन लारा

२३. भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर कोण?
उत्तर – एस. विजयालक्ष्मी

२४. फुटबॉलची सुरुवात कोणत्या देशात झाली?
उत्तर – चीन

२५. अटलांटा (१९९६) ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा खेळाडू कोण?
उत्तर – लिएंडर पेस

२६. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – अनिल कुंबळे

२७. आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी वर्ष कोणते?
उत्तर – १९९६

२८. बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला खेळ कोणता?
उत्तर – कबड्डी

२९. सलग पाच वेळा विम्बल्डन चषक जिंकणारा टेनिसपटू कोण?
उत्तर – बियॉन बोर्ग

३०. कसोटी क्रिकेट खेळणारा सर्वात लहान वयाचा भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

अधिक वाचा ➤ महाराष्ट्र सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे संच – भाग 3 (मराठी)

३१. हेलसिंकी (१९५२) ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारा खेळाडू कोण?
उत्तर – खाशाबा जाधव

३२. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

३३. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू कोण?
उत्तर – मुथय्या मुरलीधरन

३४. जगातील सर्वात कमी वयाचा कसोटी कर्णधार कोण?
उत्तर – मन्सूर अली खान पतौडी

३५. भारताकडून सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण?
उत्तर – विराट कोहली

३६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू कोण?
उत्तर – मुथय्या मुरलीधरन

३७. आंतरराष्ट्रीय पातळीवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

३८. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात खेळणारा खेळाडू कोण?
उत्तर – हसन राजा

३९. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू कोण?
उत्तर – एबी डीव्हिलियर्स

४०. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण?
उत्तर – एबी डीव्हिलियर्स

अधिक वाचा ➤ स्पर्धा परीक्षा इतिहास GK प्रश्न – मराठी माहिती

४१. कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – हरभजन सिंह

४२. कसोटी सामने सलग १६ वेळा जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाने केला?
उत्तर – ऑस्ट्रेलिया

४३. एका कसोटी सामन्यात १६ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण?
उत्तर – नरेंद्र हिरवाणी

४४. क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – रणजितसिंहजी

४५. भारतीय संघाकडून पहिले कसोटी शतक बनविणारे व पहिले कसोटी कर्णधार कोण?
उत्तर – लाला अमरनाथ

४६. सुनील गावसकर एकदिवसीय सामन्यात किती वेळा शून्यावर बाद झाले?
उत्तर – ७ वेळा

४७. आयसीसी क्रिकेट स्पर्धा जिंकणारा पहिला देश कोण?
उत्तर – दक्षिण आफ्रिका

४८. जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय कोण?
उत्तर – विश्वनाथ आनंद

४९. सॉकर या खेळाला दुसरे कोणते नाव आहे?
उत्तर – फुटबॉल

५०. गॅरी कास्पारोव्ह यांना पराभूत करणारा भारतीय बुद्धिबळपटू कोण?
उत्तर – विश्वनाथ आनंद

अधिक वाचा ➤ मराठी सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे – मराठी माहिती

५१. लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा देश कोणता?
उत्तर – अमेरिका

५२. ‘भारतरत्न’ सन्मान मिळविणारा पहिला खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

५३. पहिली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा (२०१२) विजेता देश कोणता?
उत्तर – भारत

५४. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे कोणता पुरस्कार दिला जातो?
उत्तर – उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

५५. उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा कोणता पुरस्कार दिला जातो?
उत्तर – शिवछत्रपती पुरस्कार

५६. असामान्य कामगिरीबद्दल क्रीडापटूंना केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार कोणता?
उत्तर – अर्जुन पुरस्कार

५७. क्रीडा प्रशिक्षकांना केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार कोणता?
उत्तर – द्रोणाचार्य पुरस्कार

५८. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – सचिन तेंडुलकर

५९. भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत पहिले पदक जिंकून देणारा खेळाडू कोण?
उत्तर – नॉर्मन प्रिचर्ड

६०. भारताने क्रिकेट विश्वचषक प्रथम कोणत्या वर्षी जिंकला?
उत्तर – १९८३

स्पर्धा परीक्षांसाठी या प्रश्नांचा उपयोग कसा करावा?

दररोज 10 प्रश्नांचा सराव करा. आठवड्यातून एकदा सर्व 60 प्रश्नांची पुनरावृत्ती करा. स्वतः टेस्ट तयार करा आणि वेळ मर्यादेत सोडवा. यामुळे तुमची तयारी अधिक मजबूत होईल.

महत्त्वाची सूचना : हे सर्व प्रश्न MPSC, पोलीस भरती, रेल्वे, तलाठी, तसेच शालेय स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नियमित सराव आणि पुनरावृत्ती केल्यास क्रीडा सामान्य ज्ञानात तुम्ही नक्कीच प्रावीण्य मिळवू शकता.

निष्कर्ष

क्रीडा क्षेत्र हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. योग्य तयारी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियमित पुनरावृत्ती यामुळे तुम्ही या विषयात नक्कीच यश मिळवू शकता.

अशाच उपयुक्त शैक्षणिक लेखांसाठी आमच्या मराठी वाचनालय ब्लॉगला अवश्य भेट द्या.

आपल्याला हा लेख उपयुक्त वाटला असेल तर कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या ब्लॉगला फॉलो करा.

धन्यवाद!

अधिक वाचा ➤ MPSC प्रश्नसंच 2025 – मार्गदर्शक (मराठी)

Written by Satish Wabale | Founder – Marathi Vachanalay

Post a Comment

💬 तुम्हाला हा लेख कसा वाटला?
मत, प्रश्न किंवा सूचना कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
मराठी वाचनालय फॉलो करायला विसरू नका 🙏